Pages




Thursday, 19 February 2026

*स्वप्नातून साकारलेलं घर… आणि आठवणींनी भरलेलं आयुष्य*

 *स्वप्नातून साकारलेलं घर… आणि आठवणींनी भरलेलं आयुष्य*

-------------------------------‐------------------

Dear Mr. Aniket Sir & Miss.Shraddha Mam


घर म्हणजे फक्त वीट आणि सिमेंट नाही…

घर म्हणजे स्वप्नं, आठवणी, हसू, प्रेम आणि नव्या आयुष्याची सुरुवात.


आमच्या आयुष्यातील या नव्या पर्वाची सुरुवात करताना अनिकेत sir आणि श्रद्धा Madam यांनी जे योगदान दिलं आहे, ते शब्दांत मांडणं खरंच कठीण आहे. त्यांनी फक्त इंटेरिअर डिझाईन केलं नाही, तर आमच्या स्वप्नांना आकार दिला.

*प्रत्येक भिंतीचा रंग, प्रत्येक लाईटची चमक, प्रत्येक डिझाईनचा बारकाईने केलेला विचार – सगळं काही इतकं सुंदर आणि मनापासून केलं आहे की घरात प्रवेश करताच एक वेगळंच समाधान आणि आनंद जाणवतो.*

आज जेव्हा दोन्ही कुटुंबं या घरात एकत्र बसतात, हसतात आणि नव्या आठवणी निर्माण करतात… तेव्हा मनापासून वाटतं —

तुम्ही आमच्या आयुष्यात खरंच आनंदाचा तुरा जोडला आहे. 🌸


हे घर आमच्यासाठी कायम खास राहील, कारण इथे प्रत्येक कोपऱ्यात तुमची मेहनत, तुमची समज आणि आमच्या भावना गुंफलेल्या आहेत. *तुम्ही फक्त डिझायनर नाही, तर आमच्या आयुष्याच्या खास क्षणांचे भागीदार आहात. ❤️*


आजकालच्या काळात जिथे प्रत्येक जण जाहिरातींवर, सोशल मीडियावर आणि मोठमोठ्या बॅनर्सवर अवलंबून असतो…

तिथे तुम्ही कुठेही जाहिरात केली नाही, कोणताही दिखावा केला नाही.

फक्त आणि फक्त कामावर विश्वास ठेवला… आणि “माउथ पब्लिसिटी”वर उभं राहिलात.

------------

*ही गोष्ट आम्हाला मनापासून भावली. 🙏*


📅 तुमची बांधिलकी आणि प्रामाणिकपणा

*१६/०७/२०२५* पासून सुरू केलेलं काम…

आणि *२६/१०/२०२५* च्या शेवटच्या रात्रीपर्यंत पूर्ण केलेला प्रत्येक क्षण —

तुम्ही तुमच्या कमिटमेंटप्रमाणे काम पूर्ण केलं.

अनेक डिझायनर्स आम्ही पाहिले, अनेक किस्से ऐकले…

“ऐकावं ते नवलच” असं वाटणारे अनुभव लोकांनी सांगितले.

पण तुमच्यासोबत एकदाही असं वाटलं नाही की काही गोष्ट लपवली गेली, काही स्पष्ट केलं नाही.

तुमची पारदर्शकता आणि स्पष्टपणा आम्हाला खूप आवडला.

----------------------

💰 *आणि सर्वात मोठी गोष्ट…*


आजच्या काळात अंतिम पैसे वेळेवर मिळाले नाहीत तर लोकांचा सूर बदलतो…

पण तुम्ही अंतिम पेमेंटसाठी ३–४ महिने थांबलात.

एकदाही तक्रार नाही, दबाव नाही, नाराजी नाही —

हा मोठेपणा आणि विश्वास आम्ही आयुष्यभर लक्षात ठेवू.

----------------------------


🙏 *एक मनापासून दिलगिरी*



पूजेच्या आदल्या दिवशी थोडासा माझा राग वाढला…

त्या क्षणी मी थोडं कठोर बोललोही.

पण तुम्ही संयमाने, शांतपणे सगळं हाताळलं आणि आमचा आनंदाचा दिवस तसाच सुरळीत पार पडू दिला.

आजही त्या दिवसाची आठवण झाली की मनात थोडी खंत राहते…😔😢

मनापासून दिलगिरी व्यक्त करतो.🙏

कारण आम्ही जे काही बोललो, ते क्षणिक होतं —

पण तुमचं काम आणि तुमचा संयम कायम लक्षात राहील. ❤️

-------------------

🌸 *आमच्या आयुष्यात जोडलेला आनंदाचा तुरा*


प्रत्येक भिंतीत तुमची मेहनत आहे…

प्रत्येक कोपऱ्यात तुमचं सौंदर्यदृष्टी आहे…

प्रत्येक प्रकाशात आमच्या भविष्याचा उजेड आहे. ✨

आज दोन्ही कुटुंबं या घरात एकत्र बसतात, हसतात, आनंद साजरा करतात —

तेव्हा जाणवतं…

तुम्ही आमच्या आयुष्यात खरंच आनंदाचा तुरा जोडला आहे. 🌺




*✍️ माझ्या ब्लॉगवर ही खास नोंद*



माझ्या www.nishantmane.blogspot.in� या वैयक्तिक ब्लॉगवर ही सुखदायी आणि आयुष्याला नवं वळण देणारी गोष्ट अभिमानाने शब्दबद्ध करताना मला खूप आनंद होईल…🙏 कारण हे फक्त घर नाही, तर आमच्या स्वप्नांचा आणि दोन्ही कुटुंबांच्या आनंदाचा सुंदर उत्सव आहे.

*ही फक्त इंटेरिअरची कथा नाही,*

ही आमच्या आयुष्याच्या नव्या अध्यायाची सुरुवात आहे. ✨❤️



💖 *आमच्या कुटुंबाकडून आशीर्वाद*


मी आणि माझं कुटुंब मनापासून तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला धन्यवाद देतो.

तुमच्या हाताला यश लाभो,

तुमच्या कलेला अधिक उंच भरारी मिळो,

आणि तुमच्या आयुष्यात सदैव भरभराट येवो — *हीच मनापासून प्रार्थना.*🙏✨


*मनःपूर्वक कृतज्ञता,*

– निशांत माने

प्रतीक्षा माने

आणि आमचा लाडका आयुष माने ❤️👨‍👩‍👦




Friday, 24 November 2023

हरवलेले बालपण

 हरवलेले बालपण ...


*हंड्यात* तापलेल्या पाण्याची *अंघोळ न्हाणीतली* असायची.

*लाईफबाॅयशिवाय* दुसरी कंपनी माहीती नसायची.

*ok,501* साबणाची वडी कपड्यावर घासायची...

*वासाच्या* साबणाचं कौतुक फक्त *दिवाळीला* असायचं.

*शाम्पू* कुठला लावताय राव, *निरम्यानचं* डोकं धुवायचं...

*दिवाळीच्या* एका ड्रेसवर *वर्षभर* मिरवायचं...

*थोरल्याचं* कापडं धाकट्यानं *झिजेपर्यंत* वापरायचं...

*चहा चपातीची* न्याहरी, *उप्पीट,पोहे* कौतुकाने असायचे,

*पार्ले* बिस्किटाशिवाय चहाला दुसरे जोडीदार  नसायचे...

*गोल* पंक्तीत बसून सगळ्यांनी मिळून जेवायचं...

*खर्डा ,भाकरी,झुणका* पंचपक्वानासारखं लागायचं.

*गोट्या,विटीदांडू,लपाछपी........*

कधी कधी *पत्त्यांचाही* खेळ रंगायचा...

*काचाकवड्या,जिबली* नाहीतर.....

*भातुकलीचा* डाव मांडायचा...

अधून मधून *चिंचा,पेरू,आंब्याची* झाड शोधायचं...

नाहीतर *जिभेला* रंग चढवत *गारेगार* चोखायचं...

*मणगटाची* बैलगाडी,त्याला त्याचाच *बैल* जुंपायचा...

*शेंगा* चेचून केलेला चिक्की बाॅल दणकट असायचा...

पानं चेचून केलेली *मेंहदी* हातावर खुलायची...

*बाभळीच्या* शेंगाची जोडवी बोटात खुळखुळायची...

*मनोरंजनासाठी* असायची *ब्लॅक अॅन्ड व्हाईट टि.व्ही.*

*शनिवारी हिंदी* आणि *रविवारी मराठी* मुव्ही...

*रामायण,महाभारतं शक्तीमानसाठी* रविवारची वाट बघायची...

*चित्रहार,रंगोली,छायागीत* यातून सलमान,माधूरी भेटायची.....


शाळेला* तर नियमित जायचं

वायरीचं दप्तर पाठीवर असायचं...

*उरलेल्या* पानांची वही *बायडिंग* करायची...

*निम्म्या* किंमतीत घेतलेली पुस्तकं सोबतीला असायची...

*घासातला घास* शेअर करत डबे सगळ्यांच संपवायचे...

*बॅाटल* कुठली राव...........

*टाकीच्या* नळाला तोंड लावून पाणि प्यायचं...

जमेल तेवढं करत होतो, *टेन्शन* काय नसायचं...

*कारण,* नुसतं पास झालो तरी *आई-बाप* खूष असायचं...

*पावसाळा* आला की पोत्याची गुंची करायची...

*चिखलातनं* वाट काढताना *स्लिपर* त्यात रूतायची...

एकमेकांच हात पकडून मुख्य रस्त्यानच निघायचो...

*रिक्षा,स्कूल बस* नसली तरी घरी व्यवस्थित पोहचायचो.

*दिवसभर* हुंदडून *पेंगत पेंगत* जेवायचं

एकाच *अंथरूणावर* ओळीनं सगळ्यांनी *निजायचं...*

*वाकळंतल्या* ऊबीत झोप मस्त लागायची...

*दिवसभराची* मस्ती रात्री *स्वप्नात* दिसायची...........

*दिवस* पुन्हा उजडायचा *नवी मजामस्ती* घेऊन...

*रात्रीच्या अंधाराला* तिथेच मा गे ठेवून...


*संस्मरणीय आठवणी...*

 बालपणीचा काळ आठवला.......🥰🥰🥰

🙏😊🙏

Friday, 13 August 2021

!!प्रारब्धाचा हिशेब!!

प्रारब्धाचा हिशेब  :
.
एक दिवस एक माणूस पूर्व सुचना न देता कामावर गेला नाही .
मालकाला वाटलं ह्याचा जर पगार वाढवला तर हा काम मन लावून करेल .....
.
म्हणून पुढच्या वेळेस मालकाने पगारा व्यतिरीक्त त्याला पैसे वाढीव दिले ......
तो काही बोलला नाही , त्याने चुपचाप मिळालेले पैसे ठेवून दिले .......
.
काही महिन्यानंतर परत तसच घडलं .... तो पुर्वसुचना न देता गैरहजर राहीला ... 
मालकाला त्याचा खूप राग आला आणि त्याने विचार केला कि, याचा पगार वाढवून काय फायदा झाला ???
हा काही सुधारणार नाही .....
पुढच्या वेळेस मालकाने त्याला वाढवलेला पगार कमी करून त्याच्या हाती पगार दिला .....
.
त्याने कुठलीही तक्रार न करता चुपचाप पगार घेतला .....
मालकाला खूप आश्चर्य वाटलं .
अखेर न राहवून त्याने त्याला विचारलं , '' मागच्या वेळेस तू गैरहजर राहीलास तरी तुझा पगार वाढवला ....तेंव्हा सुद्धा तू काही बोलला नाहीस , आणि ह्या वेळेस सुद्धा तू न पूर्वसुचना गैरहजर राहीलास म्हणून तुझा वाढवलेला पगार कापला ....
तरीही तू काही बोलत नाही,,,, असं का ?????
त्यावर त्याने दिलेलं उत्तर विचार मनाला भिडणारं होतं ..
.
''तो म्हणला , मालक पहिल्या वेळी मी गैरहजर राहीलो त्यावेळी मला मुलगा झाला होता ...... तुम्ही माझा पगार वाढवलात तेंव्हा मी विचार केला , देवाने माझ्या मुलाचा पालनपोषणाचा हिस्सा पाठवला .......
दुस-यांदा जेंव्हा मी गैरहजर राहिलो तेंव्हा माझ्या आईचं निधन झाले होते आणि तुम्ही माझा वाढवलेला पगार कापलात ......
मी मनाशी विचार केला माझी आई तिचा वाटा तिच्या बरोबर घेऊन गेली .
मग मी ह्या पगाराबद्दल चिंता का करू ??
ज्याची जबाबदारी खुद्द देवाने घेतली आहे ........
.
तात्पर्य -
जिवनांत काय मिळवलसं आणि काय गमावलसं असं जर कुणा विचारलं तर ,
बेशक सांगा , जे गमावलं तो माझा अविचार होता आणि जे कमावलं ती सद्गुरू कृपा होती.
.
''खूप सुंदर नाते आहे माझ्यात व देवामध्ये ....''
''जास्त मी मागत नाही आणि कमी देव देत नाही .......
👍👌👌
यालाच प्रारब्ध म्हणतात.......
जिवन खुप सुदंर आहे आनंदाने जगा ....(forwarded)