Pages




Friday, 24 November 2023

हरवलेले बालपण

 हरवलेले बालपण ...


*हंड्यात* तापलेल्या पाण्याची *अंघोळ न्हाणीतली* असायची.

*लाईफबाॅयशिवाय* दुसरी कंपनी माहीती नसायची.

*ok,501* साबणाची वडी कपड्यावर घासायची...

*वासाच्या* साबणाचं कौतुक फक्त *दिवाळीला* असायचं.

*शाम्पू* कुठला लावताय राव, *निरम्यानचं* डोकं धुवायचं...

*दिवाळीच्या* एका ड्रेसवर *वर्षभर* मिरवायचं...

*थोरल्याचं* कापडं धाकट्यानं *झिजेपर्यंत* वापरायचं...

*चहा चपातीची* न्याहरी, *उप्पीट,पोहे* कौतुकाने असायचे,

*पार्ले* बिस्किटाशिवाय चहाला दुसरे जोडीदार  नसायचे...

*गोल* पंक्तीत बसून सगळ्यांनी मिळून जेवायचं...

*खर्डा ,भाकरी,झुणका* पंचपक्वानासारखं लागायचं.

*गोट्या,विटीदांडू,लपाछपी........*

कधी कधी *पत्त्यांचाही* खेळ रंगायचा...

*काचाकवड्या,जिबली* नाहीतर.....

*भातुकलीचा* डाव मांडायचा...

अधून मधून *चिंचा,पेरू,आंब्याची* झाड शोधायचं...

नाहीतर *जिभेला* रंग चढवत *गारेगार* चोखायचं...

*मणगटाची* बैलगाडी,त्याला त्याचाच *बैल* जुंपायचा...

*शेंगा* चेचून केलेला चिक्की बाॅल दणकट असायचा...

पानं चेचून केलेली *मेंहदी* हातावर खुलायची...

*बाभळीच्या* शेंगाची जोडवी बोटात खुळखुळायची...

*मनोरंजनासाठी* असायची *ब्लॅक अॅन्ड व्हाईट टि.व्ही.*

*शनिवारी हिंदी* आणि *रविवारी मराठी* मुव्ही...

*रामायण,महाभारतं शक्तीमानसाठी* रविवारची वाट बघायची...

*चित्रहार,रंगोली,छायागीत* यातून सलमान,माधूरी भेटायची.....


शाळेला* तर नियमित जायचं

वायरीचं दप्तर पाठीवर असायचं...

*उरलेल्या* पानांची वही *बायडिंग* करायची...

*निम्म्या* किंमतीत घेतलेली पुस्तकं सोबतीला असायची...

*घासातला घास* शेअर करत डबे सगळ्यांच संपवायचे...

*बॅाटल* कुठली राव...........

*टाकीच्या* नळाला तोंड लावून पाणि प्यायचं...

जमेल तेवढं करत होतो, *टेन्शन* काय नसायचं...

*कारण,* नुसतं पास झालो तरी *आई-बाप* खूष असायचं...

*पावसाळा* आला की पोत्याची गुंची करायची...

*चिखलातनं* वाट काढताना *स्लिपर* त्यात रूतायची...

एकमेकांच हात पकडून मुख्य रस्त्यानच निघायचो...

*रिक्षा,स्कूल बस* नसली तरी घरी व्यवस्थित पोहचायचो.

*दिवसभर* हुंदडून *पेंगत पेंगत* जेवायचं

एकाच *अंथरूणावर* ओळीनं सगळ्यांनी *निजायचं...*

*वाकळंतल्या* ऊबीत झोप मस्त लागायची...

*दिवसभराची* मस्ती रात्री *स्वप्नात* दिसायची...........

*दिवस* पुन्हा उजडायचा *नवी मजामस्ती* घेऊन...

*रात्रीच्या अंधाराला* तिथेच मा गे ठेवून...


*संस्मरणीय आठवणी...*

 बालपणीचा काळ आठवला.......🥰🥰🥰

🙏😊🙏