*जेव्हा बायकोने आईवर चोरीचा आरोप केला तेव्हा मुलाने काय केले हे आवश्य पहा….*
बायको आईवर सतत आरोप करत होती आणि सतत तिला मर्यादीत राहायला सांगत होता. पण बायको मात्र गप्प बसायचे काही नावच घेत नव्हती. ती जोरजोरात ओरडून सांगत होती की मी अंगठी टेबलवरच ठेवली होती. आणि तुमच्या आईशिवाय खोलीत कोणीच आलं नव्हतं. अंगठी असो वा नको ती आईनेच उचलली आहे. गोष्ट जेव्हा पतीच्या सहनशक्तीच्या बाहेर गेली तेव्हा त्याने बायकोच्या कानाखाली जोरदार वाजवली. तीन महिन्यापूर्वीच लग्न झालं होतं. पत्नी ला ती सहन झाली नाही ती घर सोडून चालली आणि जाता जाता पतीला एक प्रश्न विचारला की तुमचा तुमच्या आईवर इतका विश्वास का आहे. तेव्हा पतीने उत्तर दिले, ते उत्तर ऐकून दरवाजामागे उभा राहिलेल्या आईचे काळीज भरून आलं.
पतीला पत्नी ला सांगितलं जेव्हा मी छोटा होतो, तेव्हा वडील वारले.आई आजूबाजूच्या परिसरात झाडू मारून ती पैसे आणायची ज्यात एक वेळेच अन्न मिळायचे.आई ऐका ताटात भाकरी वाढायची आणि रिकाम्या डब्याला झाकून ठेवायची. आणि म्हणायची माझ्या भाकरी या डब्यात आहे. बाळा तू खा,मी पण नेहमी अर्दी भाकरी खाऊन म्हणायचो आई माझं पोट भरलय आता मला नाही खायचं. आई ने माझी अर्दी उष्टी भाकरी खाऊन माझं पालन पोषण केलं, मोठं केलं.
आज मी दोन भाकरी कमवायच्या लायकीचा झालो पण हे कसं विसरू आई ने त्या वेळेस तिच्या भुकेला मारलं. ती आई त्या स्तिथी ला अश्या अंगठी साठी भुकेली असेल हा मी विचार सुद्धा करू शकत नाही. तू तर तीन महिन्यापासून माझ्या सोबत आहेस, मी तर आईच्या तपश्चर्येला 25 वर्ष्यापासून पाहिलंय. हे ऐकून आईच्या डोळ्यातून अश्रू आले आणि ती समजू शकत नव्हती की मुलगा अर्ध्या भाकरीच कर्ज फेडतोय की मुलाच्या अर्ध्या भाकरीचा कर्ज.
*मित्रानो या बद्धल तुम्हाला काय वाटलं नक्की कंमेंट करा.*