Pages




Saturday, 14 March 2020

निसर्गाची ताकद आणी मानवाची कुवत

निसर्गाची ताकद
आणी मानवाची कुवत
😡😡😡😡😡

     एका करोना व्हायरसने १५० करोडचा चीन घरातच बंदिस्त झाला. रस्ते विरान झाले चीनचे अध्यक्ष भुमीगत झाले.
एक अत्यंत सूक्ष्म जंतू.१५० कोटींचा चीन चीडीचूप झाला. अगदी अदृश्य अशा एका जंतू ने चीनची दानादान उडवली .
*अख्ख जग एका क्षणात" झोपावयाची ताकद निसर्गात आहे.*
आणी मानव मात्र अहंकाराने एकमेकांना संपवन्याची धारणा ठेवतो .करोना ने थोडाही जातीभेद वर्णभेद धर्मभेद किंवा प्रांत भेद केला नाही.सगळ्यावर सारखे प्रेम दाखवत घरातच डांबले.
    मानव मात्र हे माझे ते माझे मी अमक्या कुळाचा अमक्या जातीचा अमक्या धर्माचा असा अहंकार मिरवत फिरत असतो. ही शेखी करोना ने एका क्षणात उतरवली. "अलीकडे जरा 
जास्तच खुमखुमी व जास्तच ताठा असलेला उत्तर कोरियाचा तानाशहा अक्षरश: पळून गेला 
मरणाच्या भीतीने आपल्याच वीस हजार लोकांना ठार मारण्याची भाषा करु लागला.
    जगातील कोणताही जीव  हा निसर्गापुढे अगदीच कस्पट आहे.

करोनाने एकच संदेश दिला आहे *नीट रहा जगा  व इतरांनाही जगू द्या*
   
 जे खळांचे व्यंकटी सांडो
तया सत्कर्मी रती वाढो
भूता परस्परे जडो
मैत्र जिवाचे.
 ✅👍

No comments:

Post a Comment