संगीता : नमस्कार सर. (अध्यक्ष + इतर दोन्ही सदस्यांकडे हसतमुखपणे बघून, अगदी नम्रपणे )
अध्यक्ष : नमस्कार , नमस्कार बसा.
संगीता : THANK YOU सर
अध्यक्ष : तुमचे नाव संगीता भांगरे .
संगीता : हो सर.
अध्यक्ष : तुमचा DIPLOMA झालाय ,मग यामुळे ENGINEERING पूर्ण करण्यास जास्त वर्ष लागत असतील ना?
संगीता : नाही सर, DIPLOMA करून ENGINEERING ला ही सहाच वर्ष लागतात आणि बारावी करून ही ENGG.ला सहाच वर्ष लागतात.
अध्यक्ष : अच्छा म्हणजे तुम्ही बारावी नाही केले, दहावीनंतरच DIPLOMA केला तर.
संगीता : नाही सर, मी बारावी नंतर DIPLOMA केला.
अध्यक्ष : बारावी नंतर? मग ENGINEERING ला का नाही प्रवेश घेतला?
संगीता : सर, मी बारावी काही कारणामुळे FAIL झाली होती म्हणून DIPLOMA ला प्रवेश घेतला.
[या प्रश्नाच्या वेळेस मी थोडी नर्व्हस झाली होती आणि ते बहुतेक अध्यक्षांच्या लक्षात आले असावे कारण त्यांनी लगेच TOPIC CHANGE केला न वातावरण हसतखेळत ठेवण्याचा प्रयत्न केला, असे मला वाटले]
अध्यक्ष : तुमची HOBBY(छंद) EDITORIALS(संपादकीय) कात्रणे गोळा करणे.
संगीता : हो सर.
अध्यक्ष : मग तुमच्याकडे खूप सारे EDITORIALS(संपादकीय) साठले / जमा झाले असतील ?
संगीता : हो सर, पण जेव्हा मी ENGG. ला प्रवेश घेतला तेव्हा लक्षात आले की इंटरनेट वर ही असतात ,त्यामुळे INTERNET वरच वाचते.
(उत्तर देताना सर्वांशी EYE CONTACT होता.)
अध्यक्ष : तुमचे गाव कुठले? नाशिक का?
संगीता : हो सर,नाशिक.
अध्यक्ष : पेपरमधे संपादकियमधील शेवटचा जो PARAGRAPH असतो. त्यात नेमके काय मांडलेले असते? त्या EDITOR ला काय सांगायचे असते त्या मधून ?
संगीता : सर, संपादाकीयचा शेवटचा PARAGRAPH हा तटस्थपणे लिहालेला असतो. कोणतीही बाजू मांडताना, संपादक हा दोन्ही बाजुंचा विचार करुन लिहीत असतो. त्यामुळे ते वाचून आपण, आपला निर्णय घेऊ शकतो.
अध्यक्ष : म्हणजे संपादकीयचा शेवटचा PARAGRAPH हा त्या विषयांचा सारांश असतो?
संगीता : हो सर.
अध्यक्ष : तुम्ही कोणता पेपर वाचता?
संगीता : सर,मी 'दैनिक सकाळ' पेपर वाचते,तसेच लोकसत्ताचे ही संपादकीय खूप आवडते.
अध्यक्ष : त्यापैकी कोणते संपादकीय प्रभावी असते?
संगीता : सर, तसे बघायला गेले तर दोन्ही पेपरमधील संपादकीय गुणात्मक वाटतात त्यामुळे तुलना करायला अवघड आहे.
अध्यक्ष : म्हणजे दोन्ही पेपर QUALITATIVE आहेत. याचा नेमका उपयोग काय?
संगीता : हो सर, दोन्ही पेपर QUALITATIVE आहेत.
सर यांचा उपयोग, जेव्हा एखाद्या विषयाची चर्चा, वादविवाद करतो, तेव्हा जास्त होतो.
अध्यक्ष : तुम्हाला काय वाटते पेपरवाले बातम्या छापातात त्या किती खर्या असतात? त्या खर्या असतात का?
संगीता : हो सर, पेपरमधील बहुतेक बातम्या खर्या असतात.
अध्यक्ष : न्यूज पेपरवाले ,चॅनलवाले बातम्या देतात. त्या किती खर्या खोट्या असतात?
संगीता : सर, जेव्हा एखादे न्यूज पेपरवाले ,चॅनलवाले बातम्या देतात. तेव्हा एखादी बातमी आपणच पहिल्यांदा द्यावी, या शर्यतीपायी कधी कधी खोटी बातमीही दिली जाते, त्यामुळे त्या बातमीची ACCURACY CHECK केली जात नाही........
अध्यक्ष : अशी एखादी घटना सांगा की दिलेली बातमी खोटी होती पण तरीही ती दाखवली गेली.
संगीता : सॉरी सर, मला आता आठवत नाही.
सर : मुंबईमधे 26/11 झाले, तेव्हा काय घडले? त्यामुळे वृत्तवाहिन्यांवर निर्बंध टाकायला हवे का?
संगीता : हो सर आता आठवले. 26/11 ला आपल्या वृत्तवाहिन्यांनी आम्हीच सर्वप्रथम प्रसारित करीत आहोत या भावनेने त्या मोहिमेचे LIVE TELECAST दाखवले, मात्र याचे गंभीर परिणाम म्हणून आपल्याला आपले सैनिक गमवावे लागले. त्यामुळे वृत्तवाहिन्यांवर सेंसॉर बोर्डाने भारताच्या सुरक्षेचा विचार करून काही प्रमाणात निर्बंध टाकायला हवेत.
अध्यक्ष : मग तुम्हाला काय वाटते ?
संगीता : सर, खूप सार्या चांगल्या बातम्या असतात फक्त विश्वास ठेवताना त्यांची ACCURACY CHECK करून बातम्या दिल्यातर अजुन त्यांची विश्वासार्हता वाढण्यास मदत होईल. उदा. सर, मला भारत सरकारचे DD NEWS चॅनेल जास्त आवडते. हे चॅनेल कधी कधी बातमी उशिरा देते पण ACCURATE असते.
अध्यक्ष : म्हणजे विश्वास ठेवायचा की नाही?
संगीता : हो सर, विश्वास ठेवायचा.वृत्तपत्रे ही भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ असून भारतीयांचा त्यावर न्यायव्यवस्थेप्रमाणेच विश्वास आहे,अजुन तो ढासळलेला नाही.
अध्यक्ष : तुम्ही आजचा पेपर वाचला?
संगीता : हो सर.
अध्यक्ष : आजची हेडलाइन काय ?
संगीता : (हेडलाइन सांगितली)
मेंबर २: काही दिवसांपूर्वी लोकसत्ताचे कुमार केतकर यांनी असे म्हणाले की HUMAN DEVELOPMENT INDEX मोजण्यापेक्षा 'समाधान' / SATISFACTION FACTOR हा मोजायला हवा. तुम्हाला काय वाटते?
संगीता : हो सर, मी पूर्ण सहमत आहे, या कल्पनेस.
भारतात घर,शिक्षण अशा गोष्टींवर HUMAN DEVELOPMENT INDEX(HDI) मोजला जातो. काही वेळेस लोकांकडे या गोष्टी असूनही लोक समाधानी असातीलच असे नाही म्हणून विकास हा लोकांच्या समाधानावर मोजायला हवा.
मेंबर २: तर तुम्ही सहमत आहात ? मला अजुन EXPLAIN करा.
संगीता : सर,जेव्हा एखादी व्यक्ती काम करते, तेव्हा जर तिला ते काम आवडत असेल तर तर त्यातून तो ते काम अधिक उत्तम करेल आणि जर आवडत नसेल, समाधानी नसेल तर त्याची गुणवत्ता कमी होऊ शकते.
मेंबर २: तुम्हाला भिल्ल जमात माहितेय?
संगीता : हो सर.
मेंबर २: ती महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यात आढळते /राहते. डोंगरदर्यात राहते. ते तेथून बाहेर फक्त दोन गोष्टींसाठीच बाहेर येते. एक म्हणजे तेल न दुसरे मीठ. तेथे त्यांना जे काही उपलब्ध आहे त्यावर ते समाधानी आहेत.
संगीता : हो सर.
मेंबर २: तर मग त्यांच्याच जमातीचे, जे सध्या कॅबिनेट मध्ये मंत्री आहेत.
संगीता : हो सर.
मेंबर २: मग मला सांगा, ते आदिवासी तेथे डोंगरदर्यात रहातात ते ही समाधानी आहेत न जे मंत्री आहेत ,ते ही समाधानी आहेत ,जर मग त्यांना तेथे ते मिळत असताना ही ते मंत्री झालेत . मग या दोन्ही गोष्टी CONTRAVERSIAL आहेत असे नाही तुम्हाला वाटत?
संगीता : हो सर, या दोन्ही गोष्टी CONTRAVERSIAL आहेत. मात्र जेव्हा आपण एका क्षेत्रापुरताच विचार करतो तेव्हा त्यामधेच समाधान मानतो. जेव्हा त्यापरिघाबाहेरील क्षेत्र आपल्याला भुलावते व आपण तो परिघ सोडून बाहेरच्या जगाचा विचार करतो.अशावेळेस एखाद्या व्यक्तीचा आदर्श मानतो न आपण ही तिच्या सारखेच बनण्याचा प्रयत्न करतो............ कदाचित सरांबाबत ही असेच घडले असेल....
यानंतर मेम्बर २ सरांनी मेम्बर ३ सरांना विचारण्यास सांगितले.
मेंबर ३:तुम्ही सकाळी कोणाशीतरी भांडाला का?, बरोबर ना?
[माझ्यामते, आतापर्यंत माझी मुलाखत चांगली झाली होती, हा प्रश्न मला अनपेक्षित होता , माझी मुलाखत, रक्षाबंधन /नारळी पोर्णिमा( २४/८/२०१०) रोजी होती. मेम्बर ३ यांच्या ह्या DIRECT प्रश्नामुळे आलेला वातावरणातील ताण कमी करण्यासाठी मी उत्तर दिले..]
संगीता : नाही सर, मी कशाला भांडू? आज तर आपला सण आहे.
मेंबर ३: म्हणजे सकाळी सकाळी GIFT भेटलय वाटते?
संगीता: (मी फक्त छान स्मितहास्य केले न वातावरण TENSION FREE झाले)
मेंबर ३: तुम्ही ENGINEERING केले, मग इकडे का?
संगीता : सर, ENGINEER होणे हे माझे स्वप्न होते म्हणून मी ENGINEERING केले आणि भविष्याचा विचार करता मला माझ्या ज्ञानाचा उपयोग शासनाच्या नोकरीत कसा करता येईल? तेव्हा स्पर्धा परीक्षा द्वारे त्यास पात्र होऊ शकते हे कळल्यावर मी या क्षेत्रात आले.
मेंबर ३: पण, PRIVATE SECTOR मध्ये तुम्हाला खूप पगार आहे?
संगीता : हो सर, पण शासनाने ही सहावा वेतन आयोग लागू केलाय.
[ या उत्तरावर सर्व पॅनेल मेम्बर छान हसत होते.]
मेंबर ३: तुमच्या शिक्षणाचा शासनाला कसा उपयोग होऊ शकतो?
संगीता : सर, मी I.T.ENGINEER असून माझ्या या ज्ञानाचा शासनात विविध प्रकारे उपयोग होऊ शकतो. जसे शासनात बहुतांश कार्यक्रम COMPUTERISED आहेत. उदा.E- GOVERNANCE , आधार( AADHAR) यासाठी हे ज्ञान उपयोगी ठरेल. आमच्यासारख्या TECHNICAL व्यक्तींना संधी दिली तर त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो.
[या उत्तरावर तिन्ही मेम्बरनी एकमेकांकडे पाहत +VE म्हणून प्रतिक्रिया दिली होती.]
मेंबर ३: तुम्ही उपनिबंधक या पदास पहिला पसंतीक्रम दिलाय, त्याचे कार्य सांगा?
संगीता : (उपनिबंधक पदाची विविध कामे सांगितली.)
मेंबर ३: तुम्हाला CDMA माहितेय?
संगीता : हो सर.
मेंबर ३: काय असते CDMA?
संगीता : सर, CDMA - Code-Division Multiple Access. CDMA ही SEVICE मोबाईल मध्ये वापरली जाते. उदा. रिलायन्स यामध्ये सिमकार्ड हे मोबाइल मध्येच असते, त्याऐवजी इतर कार्ड वापरु शकत नाही. जसे NOKIA मध्ये आपण कोणत्याही कंपनीचे SIMCARD वापरु शकतो.
मेंबर ३: WLL चा FULL FORM?
संगीता : सॉरी सर , मला आता आठवत नाही.( FULL FORM OF WLL- WIRELESS LOCAL LOOP)
मेंबर ३: GSM चा FULLFORM ?
संगीता : सॉरी सर, मला माहीत नाही.( FULL FORM OF GSM= GLOBAL SYSTEM FOR MOBILE)
[हे दोन्ही प्रश्नाची उत्तरे न आल्यामुळे मी थोडी नर्व्हस झाली होती, पण पुढे लगेच सावरली ]
मेंबर ३: मोबाइलची MTNL कंपनी आहे.[या वेळेस त्यांनी माझ्याकडे पाहत म्हटले होते हे वाक्य म्हणून मी उत्तर दिले होते]
संगीता : हो सर, मुंबई मध्ये आहे.
मेंबर ३: तर मग मुंबई मध्ये MTNL कोणत्या सेवा पुरवते?
संगीता : सर, MTNL ही कंपनी मुंबई मधे DOLPHIN, MTNL ही सेवा पुरवते.
(अजुन MTNL ही TRUMP, GARUD या सेवाही पुरवते.)
मेंबर ३: GSM & CDMA मध्ये कोणती SEVICE चांगली?
संगीता : सर, माझ्यामते GSM चांगली.
मेंबर ३: GSM चांगली?
संगीता : हो,सर.
मेंबर ३: तुमच्या कमतरता कोणत्या?
संगीता : (हा प्रश्न पुन्हा अनपेक्षित होता, आता हा प्रश्न- याचे उत्तर माझे -VE POINTS मला +VE कसे होतील या दृष्टीने सांगायचे होते.. या प्रश्नाचे उत्तर मी अगदी मनमोकळेपणाने हसत दिले...आणि उत्तर संपावताना शेवटी म्हणाली) सर, मी सध्या माझ्या कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करत आहे आणि मी त्या निश्चितच दूर करेल असे मला वाटते.
( माझ्या या उत्तरास तिन्ही पॅनेल मेंबेरनी मनापासून हसून दाद दिली होती न मेंबर ३ म्हटले होते)
मेंबर ३: म्हणजे सध्या PROCESS मध्ये आहे, कमतरता दूर करण्याचे काम ...
संगीता : हो सर.
[तिन्ही पॅनेल मेम्बर नि एकमेकांकडे बघून प्रश्न संपले अशी संमती दाखवली न मला अध्यक्ष म्हणाले)
मेंबर ३: तुम्ही जाऊ शकता.
संगीता : (उभे राहून, सर्वानकडे बघून नम्रपणे म्हणाली) सर तुम्हा सर्वाना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा.........
मेंबर ३: आपल्यालापण....
TIME OVER : 11.00AM(24/8/2010)
THEN AFTER INTERVIEW I M VERY SATISFIED BECAUSE I HAVE FULL CONFIDENCE ON ME. i.e. I WILL GET POST THROUGH MPSC ........AND THEN AFTER 1MONTH RESULT DECLARED & THEN AFTER 1WEEK POST DECLARED ON THE DAY OF GHATASTHAPANA..... I GET BLOCK DEVELOPMENT OFFICER AS A POST..........
ALL THING HAPPENING LIKE DREAMS...........
SO VISUALIZE UR DREAMS........Dr. A.P.J.ABDUL KALAM.
ALL THE BEST.......
[मी असे म्हणत नाही की माझी मुलाखत PERFECT आहे, पण त्या वेळेस मुलाखतीचा फॉर्म तुम्ही कसा भरला आहे? यावर तुमची मुलाखत कशी होणार? हे ठरत असते.
उदा. माझी मुलाखत 'माझा छंद' वर जास्त आहे....... म्हणून काळजीपूर्वक विचार करून ठरवा ..... कारण आपले मुद्दे तिथे नीट मांडता आले पाहिजेत.]
No comments:
Post a Comment