Pages




Thursday 4 July 2013

थोर समाजसेवक- महात्मा फुले

                                                               
                                                      


जोतिबा फुले हे थोर आणि महान समाजसेवक महात्मा या पदाला पोहोचले होते. निरपेक्ष भावनेने समाजाला प्रगतीचा, माणुसकीचा मार्ग दाखवून लोकांचे दु: दूर करणे, हेच त्यांनी आपले ध्येय मानले होते.दुष्ट रुढी, अनिष्ट परंपरा आणि भयंकर दारिद्र्याने समाजाला ग्रासले होते. बहुजन समाज ज्ञानापासून दूर होता. स्त्रियांची अवस्था तर गुलांमांसरखीच होती. हक्क आणि स्वातंत्र्य यापासून त्या दूर होत्या. जणू सुपूर्ण बहुजन समाज हा अंधारात चाचपडत दु:खाने पिडला होता.
    अशा काळात १८२७ साली जोतिबांचा जन्म पुण्यात झाला. जेतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव तर मातेचे नाव चिमणाबाई. जोतिबा हळूहळू मोठे होऊ लागले. वडिलांनी त्यांना मिशनरी शाळेत घातले. ज्ञानाने, वाचनाने जोतिबा विचारी झाले. आजूबाजूचा दु:खी, अज्ञानी, दरिद्री समाज त्यांना दिसू लागला.
    स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचा अर्थ त्यांना समजला. स्त्रियांची दयनिय अवस्था त्यांना समजली. समाजातील विषमता, भेदभाव पाहिला. दलित बांधवांचे दु:खमय जीवन त्यांनी पाहिले. शिक्षणाचे महत्व त्यांना समजले. आणि जोतिबा अंतर्बाह्य बदललेस्त्रियांना, मुलींना शिक्षण देणे, समाजातील भेदभाव दूर करुन बंधुभावाची शिकवण देणे, दलित बांधवांना माणुसकीचे, समानतेचे हक्क मिळवून देणे अशा सामाजिका कार्याला त्यांनी सुरूवात केली.
    पुण्यामध्ये त्यांनी मुलींसाठी आणि मुलांसाठी स्त्रियांसाठी प्रथमच शाळा सुरु केल्या. सावित्रीबाई या आपल्या धर्मपत्नीला शिकवून त्यांच्यावर मुलींना, स्त्रियांना शिकविण्याचे काम सेापविले. समाजाचा छळ, अपमान सोसून सावित्रीबाईंनी जोतिबांच्या प्रत्येक सामाजिक कार्यात साथ दिली.
    जोतिबांनी शिक्षणप्रसाराचे मोठे कार्य केले. अनाथ मुलांसाठी अनाथाश्रम, दुष्काळग्रस्त मुलांसाठी आश्रम काढला. दलित बांधवांना शिक्षण आणि माणुसकीचे हक्क मिळवून देण्यासाठी रात्रंदिवस देह झिजवला. शेतकऱ्यांच्या दु:खाला वाचा फोडली. कामगार , कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी मोठी चळवळ उभारली. बालहत्या प्रतिबंध गृह सुरु केले. पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. हे सर्व सामाजिक कार्य करताना त्यांना समाजाकडून छळ, अपमान आणि दु:खाला सतत सामोरे जावे लागले.आपल्या क्रांतीकारी कार्याने ते महात्मा या पदाला पोचले.
    सतुरस्र कार्य  करुन महात्मा फुले निजधामाला गेले.

No comments:

Post a Comment